सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना
शासकीय योजनांतून विस्तार संधी
‘एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’अंतर्गत मोफत नोंदणी शिबिर
ठाणे- द नेशनल स्मॅाल इन्डस्ट्रीज कोर्पोरेशन लि, वाशी, मुंबई आयोजित ‘एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांसाठी (एमएसएमई) शासनमान्य विनामूल्य नोंदणी शिबिर पार पडले. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) ठाणे (पश्चिम) येथील टि.एस.एस.आय.ए. हाऊस येथे झालेल्या या शिबिराला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यवसाय वृद्धीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासकीय योजनांचा लाभ घेत व्यवसायाचा विस्तार करण्याचे आवाहन केले.
शिबिराच्या प्रारंभी स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी प्रास्ताविकात या शिबिर आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. या शिबिरातील सहभागींना यापुढेही त्यांच्या व्यवसायाशी निगडीत विविध सहाय्यता उपलब्ध करुन दिल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यानंतर एनएसआयसी, मुंबई शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक राजेंद्र सिंग जाडून यांनी सर्वांचे स्वागत केले. व शिबिराचा सहभागी उद्योजकांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. दीपप्रज्वलनानंतर मार्गदर्शन सत्रांना सुरुवात झाली.
यावेळी आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी मार्गदर्शन केले. अन्न प्रक्रिया व अन्न सेवा उद्योगामध्ये प्रचंड संधी आहेत. आपल्या क्षमता वाढविताना व्यवसायात वाढ करता येऊ शकतो. त्यामूळे उद्योजक, व्यावसायिकांनी मोठे स्वप्न बघण्याचे आवाहन केले. यानंतर टीसा, ठाणे यांच्या भिवंडी शाखेचे अध्यक्ष निनाद जयवंत यांनी आपल्या संघटनेबाबतची माहिती दिली. तसेच यापुढेही सदस्य उद्योजकांसाठी अशा प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळांचे आयोजन करणार असल्याची हमी दिली. डीआयसी ठाणेच्या सरव्यवस्थापिका सोनाली देवरे यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व आपल्या विभागाकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी हमी दिली. एनएसआयसीचे विभागीय सरव्यवस्थापक डी. डी. माहेश्वरी यांनी ह्या योजनेसहित एकंदरीत एनएसआयसीच्या उद्दीष्टयाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. एनएसआयसीचे व्यवस्थापक चिरो सुमित यांनी आपल्या संस्थेच्या सर्व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. युनियन बँक ऑफ इंडिया एमएयएमई विभागातील उपसरव्यवस्थापक शशी कांत यांनी एमएसएमई बँकींग प्रक्रियेबाबत माहिती दिली. यानंतर स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपाली चांडक यांनी एमएसएमई स लागू होणाऱ्या योजनांची माहिती दिली आणि ह्या येजना उद्योगास लागू करून देण्यास प्रमाणिक प्रयत्न करणार असा विश्वास दिला.
सिद्धार्थ दास, चेनलीअर चे संचालक यांनी एमएसएमई टिम चा माध्यमातून लागू होणाऱ्या उपक्रमाचे सविस्तर सादरीकरण केले आणि ह्या कॅम्प मधे उद्योजकांची ONDC वर नावनोंदणी करून घेतली. उ्दोयजिका – सविता कळवले यांनी ह्या उपक्रमां च्या सहभागातून त्यांच्या उद्योगाच्या प्रगतीची यशोगाथा मांडली
विज्डम एक्स्ट्राच्या गौरी बैरागी यांनी उपस्थित मान्यवर व सहभागींचे आभार मानले. ठाणे, भिवंडी, रायगड, मुलूंड, वाशिम आदी विविध भागातून सुमारे १२० उद्योजकांनी सहभाग घेतला होता. या उपक्रमाचे आयोजक म्हणून एनएसआयसी आणि सहआयेाजक म्हणून स्त्री उद्यमी फाउंडेशन, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान, टीसा या संघटनांनी भूमिका बजावली. उपक्रमाला डीआयसी, ठाणे यांचा ओडीओपी विभागाचे, जिल्हा अधिक्षक. कृषी विभाग यांच्या पीएमएफएमई विभागाचे सहकार्य लाभले. नॉलेज पार्टनर म्हणून विज्डम एक्स्ट्रा या संस्थेने काम पाहिले. उपक्रमाच्या संयोजनात विझ्डमएक्स्ट्रा च्या निखिलेश काळे, स्वाती देवरे, तिलक रोकैया, स्वपनील साळवे, सानिका गिलबिले, भारत शेंडगे तसेच टिसा चे एक्क्झीकुटीव सेक्रेटरी एकनाथ सोनवणे यांनी विशेष परीश्रम घेतले.

