पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाचे भूमीपुजन संपन्न

  • शासन बांधणार ३० कोटीचं स्मृती भवन
    वाई, दि. 26 : आज वाई तालुक्यातील मौजे एकसर येथे पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे प्रतिष्ठानच्या कलास्मारकाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहणी केली. तसंच नव्यानं उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत स्मृती स्मारकाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळा महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ना. मकरंद आबा पाटील, मुंबई विद्यापिठाचे उपकुलगुरु लोककलांचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी, शाहीर साबळेंच्या पत्नी माई साबळे, कन्या यशोधरा शिंदे, सुंदरगिरी महाराज आदी निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    या स्मारकाद्वारे शाहीर साबळे यांनी प्रस्थापित केलेल्या लोककलेच्या समृद्ध परंपरेला नवी दिशा मिळेल. कलावंत आणि प्रशिक्षणार्थींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत हे स्मारक राज्यातील सांस्कृतिक चैतन्य अधिक दृढ करेल. त्याचप्रमाणे शाहीर साबळे यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राच्या लोककलेला आणि संस्कृतीला समृद्ध करणारा ठरेल, असा विश्वास ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त आहे.
    शाहीर साबळे यांच्या पसरणी या जन्मगावी आठ एकर मध्ये हे भव्य स्मारक उभारले जाणार असून या प्रसंगी कुठलेही आढेवेढे न घेता अजितदादा पवार यांनी संपूर्ण स्मारकाचा आढावा घेतला. आणि स्मारक बांधून देण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली, याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे. शाहीर साबळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब निकम यांच्या प्रचंड कष्टामुळे हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top