‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले श्रमदान

स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेंडर श्रीकांत वाड, रवींद्र प्रभूदेसाई झाले सहभागी

ठाणे : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत संपूर्ण देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा पंधरवडा सुरू आहे, या ‍ अभियानातंर्गत ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज कापूरबावडी परिसरातील धार्मिक स्थळे, तसेच पोलीस ठाणे परिसरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात आले. एक दिन, एक घंटा, एक साथ हे या अभियानाचे घोषवाक्य असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण व्हावी हा असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे या भावनेने यात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.

        कापूरबावडी परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त्‍  सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेंडर श्रीकांत वाड, रवींद्र प्रभूदेसाई, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली.

        यावेळी कापूरबावडी येथील आशापुरा धाम मंदिर परिसरातील साफसफाई करण्यात आली, तसेच कापूरबावडी परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली. तसेच याच परिसरात खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त्‍ सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तसेच दर्गा  व चर्च परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे “स्वच्छता ही सेवा – स्वच्छोत्सव २०२५” या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश नागरिक सहभाग वाढवणे, पर्यावरण संवर्धन करणे आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे हा असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

        स्वच्छतेचे ब्रँड ॲम्बेसेंडर श्रीकांत वाड आणि रविंद्र प्रभुदेसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांना “स्वच्छता ही सेवा” मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आणि स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार केला.

ठाणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने या उपक्रमांद्वारे शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण केले असून, नागरिक सहभागाला नवी दिशा दिली असून आतापर्यंत ठाणे शहरात जलाशय,तलाव, नाले, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, बाजारपेठा, शाळा, मॅन्ग्रोव्ह जंगल, खाडी किनारे, धार्मिक स्थळे व पोलिस ठाण्यांमध्ये डीप क्लीन ड्राइव्ह राबविण्यात आले. वर्तकनगर येथील जगत एन्क्लेवमध्ये BWG सदस्यांसाठी कचरा वर्गीकरण, कचरा कमी करणे व कंपोस्टिंग याबाबत जनजागृती करण्यात आली. बाजारपेठा व धार्मिक स्थळांमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचारी व शाळेतील विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढण्यात आली. स्वच्छता टार्गेट युनिट (CTU) ओळखून स्थानिक रहिवासी व विविध घटकांच्या सहकार्याने स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. तसेच प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छता ही सेवा प्रतिज्ञा घेण्यात आली, ज्यामध्ये नागरिक, विद्यार्थी व सहभागी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांनी नमूद केले.


कापूरबावडी पोलीस ठाणे परिसरातील सफाई करताना मोहिमेत खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे

स्वच्छतेची शपथ घेताना खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी.

आशापुराधाम मंदिरात साफसफाई करताना खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे.

वृक्षारोपण करताना खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत घेताना खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्‌त 2 प्रशांत रोडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top