टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवात यंदा वृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आज देवीची वाजत गाजत आगमन मिरवणूक
ठाणे – धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरु केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्रोत्सवाची महती ठाणे किवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोहोचली आहे. लाखोभक्त, श्रध्दाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे ४८ वे वर्ष आहे. यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामीळनाडु येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा. अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य हा देखावा आहे
१९७८ साली ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनखाली
नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा, या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचे प्रबोधन व्हावे हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ केला, उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत.
आज दिनांक २२सप्टेंबर रोजी देवीची कळवा मार्केट येथून वाजत गाजत विधिवत पूजा करून आगमन मिरवणुक मोठ्या जल्लोशात काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्र व बाहेरील राज्यातील कला पथक, त्यात ढोल ताशे,लेझिम, आदिवासी तारपा नृत्य,वारकरी संप्रदाय, गोंधळी आदी सहभागी झाले होते देवीच्या आगमन प्रसंगी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत
मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार,माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभागप्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व इतर पदाधिकारी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच देवीची विधिवत पूजा करून प्राण प्रतिष्ठाही करण्यात आली.