“रान शिकवतोय” या देखाव्याने वेधले गणेशभक्तांचे लक्ष..
कळवा : लाडक्या गणरायासाठी विविध सजावटी आणि आकर्षक देखावे अनेक मंडळांनी साकारले आहेत. या देखाव्यांमध्ये सर्व मंडळींनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत विशेष विषयांवर जनजागृती केली. या कारकृतींना ठाणेकर नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त पसंती दर्शवली आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२५ मध्ये कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा “रान शिकवतोय” हा उत्कृष्ठ विषयाचा देखावा लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे.
गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९८५ साली कै. बाळ पाटेकर यांच्या हस्ते झाली असून या मंडळाने स्थापनेपासून आतापर्यंत विविध बोलके देखावे साकारत नागरिकांना मंत्रमग्ध आणि जागृत केले. या बोलक्या देखाव्यांमध्ये तुमचे आरोग्य हेच तुमचे प्राध्यान्य, अन्न हे पूर्णब्रामे, पर्यावरण पूरक फुलांचा देखावा, रान शिकवतोय असे अनेक विविध प्रकारचे आकर्षक आणि बोलके देखावे साकारत नागरिकांना जीवनशैली बद्दल विशेष ज्ञान देऊन जागरूक करत असतात. तसेच गुणसागरच मंडळाचे दरवर्षी पर्यावरण आणि जीवनशैली बद्दल विशेष देखावे साकारण्याकडे जास्त कल असून यंदा "रान शिकवतोय" हा जंगल विषय विशेष देखावा साकारला आहे. दरम्यान 2011 ते 2024 पर्यंत या मंडळाला विशेष देखाव्यासाठी पारितोषिके मिळत असून यंदाही शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२५ मध्ये या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. अध्यक्ष नितीन डोंगरे, उपाध्यक्ष सुमेध पाटील, सचिव मंदार विचार, उपसचिव अविनाश शिरोळे, खजिनदार विनय शिरसाट, सहखजिनदार राज विचारे यांच्यासह प्रशांत डोर्लेकर, प्रसाद मणचेकर, सुभाष गावडे, निशांत सावंत, अविनाश मोहिते, विराज शिरसाट आदी यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि लहान मुलांनी देखावा साकारण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
या देखाव्यातून जंगल आपल्याला काय देतो ? हे समजावण्याचा प्रयत्न केला असून चलचित्रद्वारे समाज, बाळ गोपाल आणि भाविकांना एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच पद्मश्री डॉ. मारुती चितमपल्ली यांच्या "रान शिकवतोय" यावरील 40 वर्षाचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात येत असून त्यांना याद्वारे मंडळाने मानवंदना दिली. दरम्यान यंदाच्या देखाव्यांच्या कलाकृतीला १० ते १५ दिवस लागले असून या देखाव्यामध्ये कोरोगेटेड पेपर, फुट्ट, खेळण्यातील प्राणी, आदींचा उपयोग केला आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही नागरिकांचा प्रतिसाद उत्तम मिळत असून नागरिकांना चांगला संदेश देण्यासाठी प्रयत्न करत असतो असे रवींद्र काकड यांनी सांगितले.
गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी चलचित्राद्वारे जंगलाबद्दल खूप छान माहिती दिली आहे. यंदाच डेकोरेशन पण खूप छान आहे. तसेच प्राणी व प्रक्षान बद्दल त्यांचे राहणीमान, खान, ऋतू आणि त्यांचा संबंध, आदी या विषय खूप माहिती भेटली. लहान मुलांना खूप काही शिकता आले असून खूप चांगले पद्धतीने प्रत्येक गोष्टीची माहिती दिली असल्याचे निमित शाहा यांनी सांगितले.