मुलुंड मधील प्रसिध्द गणेश रांगोळीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. सहा फूट रुंद आणि सात फूट लांब अशी ही रांगोळी असून ३ सप्टेंबरपासून ते १४ सप्टेंबरपर्यंत ती नागरिकांना पाहता येणार आहे. दरम्यान या रांगोळीमध्ये यंदा २५० ते ३०० रंगसंगतींचा साबुदाणाचा उपयोग करून गणेशा यांनी राक्षसाचा वध केल्याचे पौराणिक कथेचे चित्र दर्शवले आहे. दोडेचा यांनी १९६१ पासून आशा प्रकारच्या रांगोळ्या तयार करण्यास सुरुवात केली. त्यांनी तयार केलेली रांगोळी पाहण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रकार “एस एम पंडित” यांच्या कलेपासून प्रेरित होऊन असे साबुदाण्यातील चित्र साकारत असल्याचे मोहनकुमार दोडेचा यांनी सांगितले. या रांगोळी साकारण्यामध्ये कलाकार मोहनकुमार दोडेचा यांना भूपेश जोशी, दयाराम हिंदीसोटा, अर्चना पालन, भावना भानुशाली, डॉ चेतन कोटक यांनी देखील मदत केली.
