ठामपा च्या शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन
ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहर विकास विभागात विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच निषेधार्थ ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाबाबत बोलताना ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, “महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून त्याचा थेट फटका ठाणेकर जनतेला बसत आहे. या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरली असून, योग्य कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या आंदोलनात राजेश जाधव, मेहरोल, राहुल पिंगळे, कोळी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील या आंदोलनामुळे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.