युनाम पर्वत (२००४९ft ६१११मीटर )) मोहिम – एक अविस्मरणीय अनुभव

भारताची छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ११ वर्षीय ग्रिहिथा सचिन विचारे हिने १५ ऑगस्ट २०२५ माउंट युनाम पर्वतावर चढाई केली.

ग्रिहिथाचा प्रवास ९ ऑगस्ट २५ रोजी मुंबईवरून सुरू झाला, युनाम पीक मोहिम हिमाचल प्रदेशाच्या लाहौल-स्पीती खोऱ्यात स्थित आहे..१२ ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा(Acclimatization) दिवस होता आणि पुढील चढाई सुरू केली.

शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा पहाटे लवकर सुरू झाला. उंची, तीव्र थंडी (-°C ) आणि खडतर भूभाग यामुळे प्रत्येक टप्प्यावर कसोटी लागली होती. (५१८१ mtr)१७000 ft फूट उंची ओलांडल्यानंतर ऑक्सिजनची पातळी लक्षणीयरीत्या घटली थंडी, जोरदार वारे आणि विरळ ऑक्सिजन यामुळे ग्रिहिथा हिने ५८५० मीटरचा पल्ला गाठला आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे 6111 मीटरच्या ऐवजी तिने तिची साहस यात्रा 5850 मीटरपर्यंत पूर्ण केली.

१५ ऑगस्ट – भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी माउंट युनमच्या ५८५० मीटर (१९१९५ फूट) उंच शिखरावर भारतीय राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला – तो क्षण अत्यंत भावनिक होता, ज्यात वैयक्तिक यशाबरोबरच देशभक्तीचा सुद्धा अभिमान होता.

ग्रिहिथाने असेच नवनवीन विक्रम करत राहावे, उंच उंच शिखरे सर करावीत आणि भारताचे नाव मोठे करावे यासाठी भरपूर शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top