आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात भव्य दिव्य अश्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते
तर संकल्प प्रतिष्ठान आयोजीत सेलिब्रिटी दहीहंडी आदल्या दिवशी हास्य जत्रा फेम चेतना भट हिने फोडली
२०१२ सालानंतर शिवसाई गोविंदा पथकाने संकल्प प्रतिष्ठान मध्ये रचले होते ९ थर !
खोपटचा राजा गोविंदा पथकाने संकल्प प्रतिष्ठान मध्ये रचले९ थर
संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवातील मुंबई मधील हंडी फोडण्याचा मान हा लालबागचा राजा गोविंदा पथकाला मिळाला असून त्यांनी ही हंडी फोडली तर
महिला सन्मानाची हंडी असलेली ठाण्याची हंडी फोडण्याचा मान श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथक, सावरकर नगर यांना मिळाला.
सदर उत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सर्व पक्षीय नेते आमदार, खासदार, व इतर मान्यवर तसेच मराठी हिंदी सिनेसृष्टी तील कलाकारांनी ही हजेरी लावली.
यावेळी सिने अभिनेते चंकी पांडे
अभिनेते श्री. सुनिल शेट्टी यांनी जल्लोषात संकल्पच्या मंचावर येऊन गोविंदांना प्रोत्साहित करत गोविंदांशी संवाद साधला.
संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजक रवींद्र फाटक व टिम च्या वतीने सदर कार्यक्रमात शासनाचे सर्व अटी व नियम पाळून योग्य नियोजन करण्यात आलं होतं.