वागळे विभागातील कामगार वर्गातील नागरिकांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन
ठाणे :- दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात आणखी एका दहीहंडी उत्सवाची मेजवानी ठाणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील कामगार नाक्यावर एकनाथ भोईर फाउंडेशन आणि शिवसेना युवा सेना पुरस्कृत स्वराज्य प्रतिष्ठान ठाणे च्या वतीने भव्य असे दहीहंडी उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक एकनाथ भोईर आणि युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षीस ठेवण्यात आली असून प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास एक लाख 51000 चे पारितोषिक मिळणार आहे तसेच आठ सात सहा पाच असे थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना देखील आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत तसेच महिला गोविंदा पथकांना देखील विशेष बक्षिसांचे प्रयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून अनेक कलाकार देखील उपस्थित राहणार असल्याचे आयोजक एकनाथ भोईर आणि यज्ञेश भोईर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करत असल्याचे यावेळी यज्ञेश एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.