लाखोंच्या बक्षिसांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख अकरा हजारांची देणगी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
चौथ्या थरापासूनच बक्षिसांची लयलूट
5 हजार गोविंदाची करणार क्षुब्धाशांती
ठाणे – नवयुग मित्र मंडळ आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्टने आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात सामाजिक भान राखले जाणार आहे. चौथ्या थरापासून नऊ थर लावणाऱ्या सर्वच गोविंदा पथकांना आयोजकांकडून बक्षिसे तर दिली जाणारच आहेत. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रूपयांचे अर्थसहाय्य देखील करण्यात येणार आहे.
गौरव स्वीट समोर, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक (हैप्पी वेली), टिकूजिनीवाडी रोड, मानपाडा, येथे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट आयोजनाने मंडळाचे संस्थापक, भाजपा ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष रमेश बा. आंब्रे व मा. नगरसेविका व मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ. स्नेहा रमेश आंब्रे व मंडळाचे मार्गदर्शक व सरचिटणीस व आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉ. सागर रमेश आंब्रे यांच्या पुढाकारातून या दहीकाला तथा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उत्सवाचे 21 वे वर्ष आहे.
या उत्सवास 15 ऑगस्टच्या मध्यरात्री कृष्णजन्मोत्सवाने सुरूवात होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे – मुंबईतील अनेक गोविंदाना निमंत्रण देण्यात आले असून 1 लाख 11 हजार 111 रूपयांचे पहिले पारितोषिक विजेत्या पथकास देण्यात येणार आहे. तसेच, ४, ५, ६, ७ थराच्या पथकांना विशेष पारितोषिके; ७ थर लावणाऱ्या पथकास स्नेहा ताई नारीशक्ती गौरव पुरस्कार; ८ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास मनोज सिंग थर संघ सन्मान पुरस्कार आणि ९ थर लावणाऱ्या पथकास शंकर पवार मानाचा गोविंदा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असून नवयुग मित्र मंडळ (रजि.) तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १, ११, १११/- रकमेचा धनादेश फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे.
दरम्यान, या उत्सवास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री, अजित दादा पवार , भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , वनमंत्री गणेश नाईक साहेब, आ. चित्राताई किशोर वाघ, भाजप महामंत्री अॅड. माधवीताई नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संदीप लेले , आ. ऍड. निरंजन डावखरे आ. संजय केळकर , मंत्री अॅड. मंगल प्रभात लोढा साहेब, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ , उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने , तहसीलदार उमेश पाटील , ठामपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख सल्लगार तथा ऑल इंडिया बंजारा समाज सेवा संघ अध्यक्ष शंकर पवार, प्रमुख सल्लागार मनोज सिंग, मंडळाच्या सदस्या डॉ. श्रुती सागर आंब्रे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण, चंद्रभूषण मिश्राजी, गौरव स्वीट्स चे मालक विरलभाई पटेल, सुनील गंद्रे, देवाभाई मोदवाडिया, गोगनभाई जडेजा, राजेश सावंत, अलोक ओंक. जयेश व्यास, मनोज बापोद्रा, हमीरभाई तरकाला, शुभम कुसाळकर, अवधेश द्विवेदी, दीपक तरकाला, शकैलास ओडेद्रा, नितीन ओडेद्रा, अखिलेंद्र मिश्रा, अवतार सिंग बिंद्रा, विजय निकम, प्रशांत मोरे, शिवाजी मोरे, मारुती काटे, विठ्ठल कदम, अमित पेडणेकर, अनिल शहा, राकेश बोऱ्हाडे, अमित मिश्रा, कृष्णा यादव, विजय विश्वकर्मा, अरविंद यादव, हरीश यादव, अजय पंडित, राम हटवटे, दिनेश रसाळ, देवा यादव, प्रताप जैस्वार, अतुल मिश्रा, दिनेश बनसोडे, चेतन जमादार, हर्षल सेठ, राहुल मोदवाडिया, दिपक शॉ, औतार सिंह बिंद्रा, लक्ष्मण काशीद, उमेश वाकचौरे, रवी ओडेद्रा, संजय कनोजिया, . मनोज कनोजिया, सुदर्शन सालकर, केतन पाटील, रुपेश जाधव, दीपक तरकाला दिनेश अहिरे, सुयश वाघ, करण साळवी आदी मंडळ पदाधिकारी व सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.