ठाण्यातील शिवसेना माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नळपाडा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी 4 ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नळपाडा, गांधीनगर, सुभाष नगर, आदी भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार असून या नव्या कार्यालयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तसेच नागरिकांना अनेक समस्यांसाठी महापालिकेत यावे लागत होते. मात्र आता या जनसंपर्क कार्यालयामुळे अनेक समस्या त्या ठिकाणी सोडवणार आहेत. माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे पत्नी माजी नगरसेवक कल्पना पाटील यांच्यासह प्रमुखांना त्यांचे दोन्ही सुपुत्र विकी पाटील आणि नरेंद्र पाटील देखील नागरिकांच्या सेवेत सहभागी होणार असल्याचे शिवसेना माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, शिवसेना माजी नगरसेवक व सभापती स्थायी समितीचे संजय भोईर, शिवसेना विभागप्रमुख रवी घरत, समजसेवक अंकुश मढवी,समजसेवक राजू घरत, हरी तिवारी, हरीश सिंघ यांच्यासह असंख्य महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
