ठाणे : जंक फूड दूर ठेवूया, पौष्टिक फूडच खाऊया ही टॅगलाईन अंमलात आणत पहिल्यांदाच आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनतर्फे आयोजित पौष्टिक पाककला स्पर्धा आरोग्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. नाचणीचा उपमा, नाचणीची पुडींग, ज्वारी – नाचणीची बर्फी, कुळीथ चॅट्स, नाचणीचे मोमोज, सँडविच डोसा, मिलेट्स बार, स्टीम दही वडा, होममेड बॉर्नव्हिटा असे १०० हून अधिक पौष्टीक पदार्थ एका छताखाली पाहायला मिळाले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धकांनी खमंग आरोग्याची चव देत अगदी शेफच्या वेशात सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
रविवारी सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता ५ वी ते सातवी, आठवी ते दहावी, अकरावी ते १५ वी, खुला गट (साायकलिस्ट) आणि खुला गट (नॉन सायकलिस्ट) अशा पाच गटांत ही स्पर्धा पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आ. ॲड. निरंजन डावखरे म्हणाले की, जगाच्या पाठीवर पाहिलेआता बाहेरचे देश ऑर्गनिक फूडकडे वळत आहेत. शारिरीक व्यायामाबरोबर मानसीक व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:बरोबर इतरांनाही सायकलिंग करायला प्रोत्साहन द्या. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि परिक्षक डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले की,आरोग्यदायी आहार तर घ्याच पण व्यायाम म्हणून सायकलिंग देखील करा. न्युरोसर्जन आणि मुंबई सायकल महापौर डॉ. विश्वनाथ अय्यर यांनी सर्व आजारांवर सायकलिंग हा चांगला उपाय आहे. तुमच्या दैनंदिन सवयीमध्ये सायकलिंगला महत्त्वाचे स्थान द्या. यावेळी महाविद्यालयाच्या सचिव डॉ. मानसी प्रधान यांच्यासह आहारतज्ज्ञ, परिक्षक डॉ. शीतल नागरे, क्रीडा शिक्षक, परिक्षक निखील गावडे, पाककलातज्ज्ञ, लेखिका आणि परिक्षिका वृंदा दाभोलकर, डॉ. अमोल गीते, पत्रकार संदीप लबडे, रुशील मोरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या समन्वयिका डॉ. प्रतिक्षा बोर्डे यांनी सायकल आणि पौष्टीक आहार हा विषय शासन दरबारी पोहोचविण्याची विनंती आ. डावखरे यांना केली. संस्थेच्या संस्थापिका – प्रज्ञा म्हात्रे यांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी आ. डावखरे यांनी त्यांच्या माध्यमातून भविष्यात सहकार्य करावे असे सूचविले, या आवाहनाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुत्रसंचालन प्रा. महेश कुलसंगे यांनी केले.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
पाचवी ते सातवी
प्रथम : आरोही घाडगे, द्वितीय : श्रेष्ठा तुरबाडकर, तृतीय हेरंभ बोडके, उत्तेजनार्थ : वंशिका पाडावे आणि सान्वी जाधव, विशेष पारितोषिक : स्वरा बेबाले
आठवी ते दहावी
प्रथम : तनिष्क झगडे, द्वितीय : स्वरांग कदम, तृतीय : पुर्वा देशमुख, उत्तेजनार्थ : भूमी आणि तन्मय देसाई, विशेष पारितोषिक : हेमा किरण
अकरावी ते १५ वी
प्रथम : तनिष्का राऊत, द्वितीय : आर्या अपराज, तृतीय : वैभवी पाटकर, उत्तेजनार्थ : आर्या किलजे आणि इशा वाजे, विशेष पारितोषिक : जहान सर्वेय्या
खुला गट (सायकलिस्ट)
प्रथम : चंद्रशेखर जगताप, द्वितीय : आशिष मगम, तृतीय : लतीक गोलटकर, उत्तेजनार्थ : ममता प्रभू
विशेष पारितोषिक : शैलेंद्र राजेशिर्के
खुला गट (नॉन सायकलिस्ट)
प्रथम : मुग्धा पवार, द्वितीय : पूनम पवार , तृतीय स्वप्नल काजळे, उत्तेजनार्थ : मृणाली सावंत आणि प्रणाली चकोले, विशेष पारितोषिक : कमल पिसे
विशेष उल्लेखनीय सहभाग : आनंद विश्व गुरुकुल