ठाणे शहरात उत्सव, कार्यक्रम व तथाकथित सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जिवंत झाडांवर विद्युत रोषणाई, वायरिंग व जड साहित्य लावले जात आहे. ही कृती सौंदर्यीकरण नसून झाडांवरील अमानुष हिंसा आहे. झाडे सजावटीचे खांब नाहीत; ती शहराचा श्वास आणि नागरिकांचा प्राणवायू आहेत.
या प्रकारामुळे झाडे जखमी होत असून पक्षी, कीटक व जैवविविधता नष्ट होत आहे. एका बाजूला शासन Net Zero व LiFE Missionची भाषा करते, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक यंत्रणांकडून झाडांवर थेट आघात केला जात आहे.हा असह्य विरोधाभास आहे.
जिवंत झाडांवर कोणत्याही प्रकारची विद्युत रोषणाई व सजावटीस तातडीने पूर्ण बंदी घालावी, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी कळकळीची मागणी मा. मुख्यमंत्र्यांकडे डॉ. प्रशांत सिनकर पर्यावरण अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार, यांनी केली आहे

