शिवसेनेच्या वतीने मोफत शिबिराला नागरिकांना उदंड प्रतिसाद

माजी महापौर प्रेमसिंग रजपूत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्या सह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

ठाणे :- शिवसेनेच्या वतीने दिनांक 5,6,7 डिसेंबर 2025 रोजी हरीनिवास येथील जय भगवान हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नागरिक सुविधा शिबिराचे उद्‍घाटन शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे महानगर पालिकेचे माजी महापौर श्री.प्रेमसिंग रजपूत यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. तसेच यावेळी कार्यक्रमाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार यांचीही प्रमुख उपस्थिती होती
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आधारकार्ड पत्ता बदल, ई-श्रम कार्ड, सीनियर सिटीझन कार्ड, मतदान कार्ड, महिला बचत गट पॅनकार्ड तसेच आयुष्यमान कार्ड यांसारख्या विविध शासकीय सेवांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व संसदरत्न लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के यांनी या शिबिराला भेट दिली व उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल प्रितम रजपूत व सिमा रजपूत यांचे कौतुक ही केले या दोन्ही कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, उपशहरप्रमुख राजू गजमल,शिवसेना नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, लोकसभा सचिव श्री कुलकर्णी, विभाग प्रमुख दिपक म्हस्के, शाखाप्रमुख वसंत कोंडभर, शाखाप्रमुख विजय मालुसरे,शाखाप्रमुख विजय डावरे, चंद्रकांत (गोट्या) सावंत, अमित जोशी, वैशाली जोशी, अंजली आहिरे, स्वरा नेवरेकर, सुरेखा जाधव, निर्मला रजपूत, संध्या हुमणे, सुषमा चोरगे, उज्वला सूर्यवंशी, मयुरा लोहाटे,स्वनिल नेवरेकर, राजेश पवार, चंद्रकांत जाधव, बजरंग हतेकर, तेजस ठाकूर, गौरव चिंगळे,मयुरेश सावंत, विलास अव्हेरे, उपशाखाप्रमुख दिनेश मांडवकर, दिनेश चिकणे, निमेश भांडेलकर, निलेश रजपूत, अजिंक्य खंदेरे, मितेश गजमल, यश सिनलकर कार्यक्रमाचे आयोजक समाजसेवक श्री.प्रितम प्रेमसिंग रजपूत, समाजसेविका सौ. सीमा प्रितम रजपूत यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिवसैनिकांची उपस्थिती लाभली.

प्रभाग क्र २१ मधील नागरिकांना शासकीय योजना व कागदपत्रांच्या सुविधांचा लाभ एकच छाताखाली मिळवा या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आजच्या डिजिटल युगात नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी होणारी धावपळ लक्षात घेता, असे मोफत शिबिर उपयुक्त ठरत असल्याचेही सीमा रजपूत यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले

आधारकार्ड दुरुस्ती, नव्याने कार्ड काढणे, आयुष्यमान कार्ड नोंदणी, सीनियर सिटीझन कार्ड यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिला बचत गटाच्या महिलांनी देखील पॅनकार्डसाठी या शिबिराला स्थानिक नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला .

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक प्रितम रजपूत व सीमा रजपूत यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. भविष्यातही असे जनहिताचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही आयोजकांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top