ठाणे – कळवा येथील महात्मा फुले नगरात डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार तुळशीराम साळवे यांनी आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
शुक्रवारी महात्मा फुले यांचे सहकारी लहुजी वस्ताद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन येथील अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अभिजीत पवार, पुजा शिंदे- विचारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिक शिंदे, समीर नेटके, संदीप शिंदे, अजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या जयंतीनिमित्त तुळशीराम साळवे यांनी महानगर पालिकेच्या शाळांमध्ये खाऊ वाटप केले. यावेळी तुळशीराम साळवे यांनी, लहुजी वस्ताद यांचे सामाजिक कार्य प्रचंड महान आहे. त्यांनी समाजसुधारणेच्या कामात महात्मा फुले यांना केलेले सहकार्य मोलाचे होते. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या सखोल कार्याचा लेखाजोखा समाविष्ट करावा, अशी मागणी केली.

