ठाणे : वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा ३९ वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले.
काल बुधवारी संध्याकाळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी भेट दिली तर आज गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व भाजप चे ठाणे जिल्ह्या संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्व. बळीराम वासुदेव नईकबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने १४ नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोशणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. पहाटे साईबाबांची अभ्यंगस्नान पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ, तसेच संध्याकाळी भजन-कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचे व लाडू प्रसादाचे ही आयोजन करण्यात आले आहे या महाभंडाऱ्याचा वलाडू प्रसादाचा ही भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
उत्सवाचा समारोप १४ नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे.
हा उत्सव यशस्वी करण्यासाठी साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नाईकबागकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरी माळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राम्हण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी मेहनत घेतली.
आजच्या कार्यक्रमा विषयी श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष श्री मंगेश सुहासिनी बळीराम नईबागकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली.

