ठाणे :ठाण्यातल्या काही शाळांमध्ये तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने मनसे नेते अविनाश जाधव यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत आज ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत शाळांची केली तक्रार
राज्य सरकारकडून हिंदी सक्ती रद्द करूनही विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात हिंदी विषय शिकवत असल्याने अशा शाळांवर कारवाई करण्याची मनसेच्या वतीने ही मागणी करण्यात आली यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष रवी मोरे,व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
