स्वीट काउंटी केक शोपच्या ” मदर्स डे ” निमित्त आगळावेगळा केकने वेधले नागरिकांचे आकर्षण..

ठाणे :- “आई” म्हणजे सर्वांच्या जीवनातील अशी व्यक्ती जी आपल्यासाठी तिचे सर्व स्वप्नांचा त्याग करून आपल्याला मोठे करते. तिचं प्रेम, तिचे कष्ट आणि आपल्यासाठीचा तिचा त्याग, याला एक दिवस पुरेसा नाही, पण मदर्स डे हा तिच्या वरच्या प्रेमाला व्यक्त करण्याचा एक खास क्षण असतो. यंदा रविवारी ११ मे रोजी मदर्स डे असून ठाण्यात अनेक ठिकाणी आगळ्यावेगळ्या भेट वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे.

    ठाण्यातील बाजारपेठेत "मदर्स डे" निमित्त अनेक भेट वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध झाले आहेत. त्यातच पाचपाखाडी येथे स्वीट काउंटी या केक शॉपमध्ये अनेक आगळेवेगळे प्रकारचे छोटे ते मोठ्या आकाराचे केक बनवले आहेत. यात शुगर फ्री केक, गाजर हलवा, रोझ फालुदा फोटो केक, माँ बुके, फुगे, "मदर्स डे" बलून डेकोरेशन सेट, चॉकलेट हॅम्पर्स, चॉकलेट बुके,  आणि इतर अनेक प्रकारचे भेट वस्तू उपलब्ध आहेत. तसेच या केकची किंमत ₹२५० ते ₹६५० पर्यंत ग्राहकांच्या मागणी प्रमाणे बनवून देण्यात येणार असून या आगळ्यावेगळ्या केक ने अनेक नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे महिला व्यवसायिक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top