ठाणे- शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच मुंबई येथे मातोश्री वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली तर ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे त्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबीरांचे ही आयोजन करण्यात आले होते
संध्याकाळी डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अभिष्ट चिंतन कौटुंबिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते राजन विचारे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर येथून अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संपूर्ण सभागृह भरून गेले होते. त्याचबरोबर पंढरपूर ,धुळे , नाशिक जुन्नर, येथूनही अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार सुनील शिंदे, संपर्कप्रमुख नरेश मनेरा ,जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज मयेकर, सुनील पाटील कृष्णकुमार कोळी, सचिन चव्हाण, समन्वयक संजय तरे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख , सुहास सुर्वे, राजेंद्र महाडिक,प्रवक्ते अनिश गाढवे, तुषार रसाळ महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम धवन, सर्व विभाग प्रमुख ,उपविभाग प्रमुख ,शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ,गटप्रमुख युवा व युवती सेना पदाधिकारी व त्यांचे चाहते पोलीस अधिकारी, वकील, उद्योजक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
