राज्यशासनेच्या माध्यमातून आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनला सहकार्य करणार : प्रताप सरनाईक


ठाणे: आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन शहरापासून आदीवासी पाड्यांत राबवत असलेल्या सायकल चळवळीच्या माध्यमातून विविध उपक्रमांना राज्यशासनाच्या माध्यमातून तसेच, मी वैयक्तीकरित्या जे सहकार्य लागेल ते करेल असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी. आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशनने सुरू केलेल्या या मोहीमेत त्यांनी संपूर्ण ठाणेकरांना सहभागी करुन घ्यावे असे देखील सरनाईक यावेळी म्हणाले.

आम्ही cycle प्रेमी फाऊंडेशन “CycleWari” या बोधचिन्हाचे अनावरण रविवारी मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्यावतीने सायकलप्रेमींच्या गप्पा गोष्टी, सायकलबद्दल प्रशासनाची जबाबादीर, सायकलविषयी विविध चळवळी यासर्वांची माहिती देणारे पॉडकास्ट सिरीज सुरू केली आहे. त्या पॉकास्ट सिरीजचे नाव “CycleWari” असे ठेवण्यात आले आहे. काल अनोख्या पद्धतीने या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सरनाईक म्हणाले की, या फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी गेली ३-४ वर्षे सातत्याने सायकलच्या माध्यमातून आरोग्य जागृती, पर्यावरणसंवर्धन आणि समाजप्रबोधनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. “CycleWari” हे केवळ एक बोधचिन्ह नाही, तर सायकल संस्कृतीला चालना देणारे प्रेरणादायी प्रतीक आहे. प्रज्ञा म्हात्रे आणि संपूर्ण सायकलप्रेमी फाऊंडेशन टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देतो. ठाणे शहरातील अनेक सायकलस्वार संस्थेने जोडले आहेत. शहरातच नव्हे तर लांबपल्ल्यासाठीही हे सायकलस्वार एकत्र हाबेर पडतात. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत लहानमुलांपासून द्येष्ठ नागरिक देखील सहभागी झाले आहेत. प्रदुषण टाळण्यासाठी जनजागृती देखील ही संस्था करत आहे. जव्हार सारख्या ठिकाणी सायकल आणि शिक्षण यांना एकत्र आणणारा सायक्लोएज्यु हा उपक्रम ते राबवित आहेत. पालघरचा संपर्क प्रमुख म्हणून त्यांना या उपक्रमासाठी जे सहकार्य लागेल ते मी करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. यावेळी संस्थेचे सचिव दीपेश दळवी, ७० वर्षीय दुर्गा गोरे, मीनाक्षी गायकवाड, अजय भोसले, अमोल कुळकर्णी, संभाजी गिरी, ज्ञानदेव जाधव, ऋषीराज टिल्लू, गिरीश चिलकेवार व इतर सायकलप्रेमी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top