रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांमुळे झाडांची कत्तल..कृत्रिम सावलीचा आसरा..

सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाण्यातील नैसर्गिक हिरवी अच्छायादन हरपली..

ठाणे :- वाढते शहरीकरण, रास्ता रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक हिरवी अच्छायादने हरपली आहे. या विकासकामांमुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांनी कत्तल करण्यात आली त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे महानगर पालिकेला कृत्रिम सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे.

      स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेने " स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे" असा संदेश देत विकासकामांना भरारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने " झाडे लावा, झाडे जगवा" ही मोहीम देखील हाती घेतली. दरम्यान रस्ता रुंदीकरण विविध प्रकल्पांमध्ये 

विकासकामांमध्ये अर्थाळा निर्माण होणाऱ्या झाडांची कत्तल किंव्हा पूर्णवसन करण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्ते बकाल झाले असून नैसर्गिक सावली हरवली आहे. त्याचा फटका ठाणेकरांना बसत आहे.

या रस्त्यांना दिलासा..

 ठाण्यात ६ हजार ३६७ झाडे असून त्यामध्ये गुलमोहर, रातराणी, पिंपळ, अशोक, बदाम अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. शहरात विविध ठिकाणांवरील रस्ते बकाल झाले असताना चरई, महापालिका मुख्यालय परिसर, उपवन, कामगार, तलाव पाळी परिसर, नितीन कंपनी सिग्नल, कॅडबरी सिग्नल, तीन हात नाका सिग्नल परिसरातील सर्विस रोड, जुना सिव्हिल रोड, जेल रोड, मनिषा नगर, कावेरी सेतू, वसंत विहार असे विविध रस्ते दुतर्फा लावलेल्या झाडांमुळे नैसर्गिक हिरव्या आच्छादनांनी बहरलेली आहेत.

सिग्नलवर पडद्यांची सावली..

  वाढत्या उन्हाच्या तडाखा नागरिकांना बसत असून उष्माघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महानगर पालिकेने ६० सेकेंदान पेक्षा जास्त वेळ आलेल्या सिग्नल परिसरात कृत्रिम सावलीची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये तीन हात नाका, आल्मेडा चौक, खोपट, नितीन कंपनी या सिग्नलवर ६ ठिकाणी हिरव्या पडद्यांचे कृत्रिम आच्छादानने उभारली आहेत. त्यामुळे प्रवाश्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top