ठाणे – काल ठाण्याचे माजी व खासदार शिवसेना नेते राजन विचारे यांनी एका मुलाखती दरम्यान भारतीय जवानांनी अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का असे उद्गार काढले होते याचाच निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून त्यांना ठाण्यातील मनो रुग्णालय ऍडमिट करा अशी मागणी करत आज मनो रुग्णालय येथे आंदोलन करण्यात आले
राजन विचारे यांनी असे उद्गार करून सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांनी ताबडतोब सैन्य दलाची माफी मागावी व सैन्याबरोबर देशाच्या नागरिकांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या आहेत म्हणून त्यांनी माफी मागावी असे निवेदन यावेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य व ठाणे- धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी केले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मनोरुग्णालयात ठेवावे लागणार असून आता ठाण्याच्या मनोरुग्णालयाचे नाव बदली करून उ बा ठा मनो रुग्णालय असे करावे लागेल असे यावेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य व ठाणे, धाराशिव लोकसभा प्रमुख नितीन लांडगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
यावेळी युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जोरदार घोषणा बाजी करत निदर्शने करण्यात आली.