पावसामुळे ठाणेकर नागरिक हैराण..पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी..पाले भाज्यांसह पावसाळी रानभाजी व भुईमुग खातोय भाव..

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाने जोरदार बेटिंग सुरू केले आहे. मात्र या पावसामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढल्याने विक्रेत्यांसह नागरिक देखील त्रस्त आहेत.

     गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बाजार समितीमध्ये भाज्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठाण्यातील बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक कमी होत असून मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. तसेच या दर वाढीमुळे व्यापाऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरी जावे लागत आहे. पुढील आठवडाभर बाजारात आवक कमी राहणार असून, दर 10 ते 20 रुपयांनी किलोमागे वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. 

ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे सध्याचे दर

यात मेथी 40 , शेपू 30, कोथिंबीर 30, पालक 20, कांद्याची पात 20, वांगे 25, भरताचे वांगी 40, फ्लॉवर 40, पत्ता कोबी 30, भेंडी 40, कारले 30, गवार 30, दोडके 20, टोमॅटो 60, शिमला मिरची 30, लिंबू 20, अद्रक 50, दुधी भोपळा 60, कांदे 50, बटाटे 40, लसूण 60, शेवग्याच्या शेंगा 100, कैरी 100, काकडी 40, गाजर 60 अशा दरात विक्री होत आहे.

पावसाळी रान भाजी देखील खाते आता भाव

     पावसाळा सुरू झाला असून आदिवासी बांधव रान भाज्या घेऊन बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मात्र पावसामुळे या रान भाज्या भाव खात असून देखील ठाणेकर नागरिक आवडीने खरेदीसाठी गर्दी करत आहेत. या रान भाजीमध्ये शेवळाची 1 जुडी 30 ते 50 रुपये तर 3 जुडी 100 रुपये तर अळूच्या वड्यांची पानाची एक जुडी 30 रुपये अश्या दरात विक्री करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top