ठाणे :- नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होत आहे.
अधिकाऱ्यांनी नुसते पाहणी दौरे करत नालेसफाईबाबत आश्वासने देण्यापेक्षा रस्त्यावर उतरवून त्या ठिकाणी स्वतःहा उभे राहून विहित मुदतीत नालेसफाईची कामे करून घ्यावीत.जेणेकरुन थोड्या पावसात पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरिकांना त्रास होणार नाही.
नालेसफाईच्या कामात सातत्याने हातसफाई होत आहे.त्यामुळे आतातरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्या नाहीतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरी हितासाठी आम्हाला कठोर आंदोलनात्मक भूमिका लागेल असा इशारा ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.
