निवडणूक आयोगाचा ठाण्यात तीव्र निषेध

ठाणे : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही टिकणार नाही असे उदगार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार यांनी ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांनी केले
निवडणूक आयोगाने केलेल्या या कृर्त्याचा आज ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पक्षप्रवक्ते व आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वा खाली निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी पोस्टर जाळण्याचा ही प्रयत्न करण्यात आला तसेच पोस्टर पायदळी ही तुडवण्यात आले
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा सुजाता घाग, अभिजित पवार, तसेच सर्व , राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top