ठाणे :- ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच डेबट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने, त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळालेली आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पाच वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे व 30वर्षे जुनी असलेली एकूण 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये दोन कोटी दोन लाख रुपयांची तडजोड झाली.
ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 131 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. एकूण 14 कोटी 40 लाख 38 हजार रुपयांची तडजोड करण्यात आली. डेबट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे 137 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात 39 कोटी 24 लाख 41,133 रुपये रकमेची तडजोड झाली.
वैवाहीक वादाच्या एकूण 61 प्रकरणांमध्ये यशस्वी समेट करण्यात आला. त्यापैकी 10 प्रकरणांत पती-पत्नी एकत्र नांदावयास गेले. धनादेश प्रकरणांतील जुनी
प्रलंबित 685 प्रकरणे निकाली काढून त्यात 10 कोटी 77 लाख 673 रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरुपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 21,409 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम एक कोटी पाच लाख 49 हजार रुपये जमा केली. प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्युची दाखलपूर्व 60,409 प्रकरणे निकाली निघाली. त्यात दोन कोटी 10 लाख 68,967 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली.