ठामपा शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने उगारली छडीशिक्षण विभागाच्या दारात ठाणे काँग्रेसचे लक्षवेधी निषेध आंदोलन

ठाणे :- ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठामपा शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्याच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली. दरम्यान, यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा, विष्णुनगर येथील ठामपा शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेस प्रवक्ते राहूल पिंगळे, हिंदुराव गळवे, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, जे. बी. यादव, रविंद कोळी, स्मिता वैती, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, जयेश परमार, जावेद शेख, शिरीष घरत संगीता कोटल,अंजनी सिंग, श्रीकांत माने, श्रीकांत गाडीलकर, उमेश कांबळे, आनंद सांगळे, रजनी पांडे, प्रभाकर थोरात, दयानंद एंगडे, सुधाकर जाधव, अजिंक्य, स्वप्नील भोईर, खेडेकर नूरशीत, सुमनताई वाघ, बाबू यादव यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या हक्काची होणारी पायमल्ली, शिक्षणाचा घसरलेला दर्जा, शाळाच्या इमारतींची दयनीय अवस्था यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसने लक्ष वेधले. पालिकेच्या तासिका शिक्षकांना अर्हतेनुसार कायम करा,शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीने भरून
शिक्षण समितीतुन बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतीच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचा-यांनाही बढती द्यावी.डायरेक्ट बेनिफिशरीचे (डीबीटी) पैसे तातडीने वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठीच्या योजना तातडीने अंमलात आणाव्यात. शिक्षण समितीतील कर्मचारी व शिक्षकांचे मनपा सेवेत समायोजन करावे. पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्याना कॉम्प्युटर तसेच स्काऊट गाईडचे गणवेश, व बुट तातडीने उपलब्ध करावेत. विद्यार्थ्याचे तास कमी करून शालेय पोषण आहारामध्ये दुध, बिस्किटे व चिक्कीचा समावेश करावा.सर्व शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट आयआयटी अथवा व्हीजेआयटीकडून करून घेणे बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे..शैक्षणिक शुल्कवाढीला चाप लावुन शाळेतील सुरक्षा व्यवस्था व स्वच्छतेकरीता फिरत्या दक्षता पथकाची स्थापना करावी. विद्यार्थी संख्येनुसार शाळांमध्ये अद्ययावत स्वच्छतागृहे, प्रयोगशाळा,उपहारगृह तसेच विश्रामकक्ष आणि डॉक्टर व परिचारिका रुजु करावी. आरटीईची थकीत रक्कम तातडीने वर्ग करून शांळाकडून त्याचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही, याची खातरजमा करावी. मनपाच्या इंग्रजी शाळांना मान्यता देऊन कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजूरी द्यावी, तसेच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावेत. आदी अनेक मागण्या काँग्रेसने ठामपा शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.

‘मराठी’ साठी काँग्रेस आग्रही

ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांमध्ये मराठी लोकांना रोजगार मिळावेत तसेच, शाळांमधील कंत्राटे व पुरवठादारांमध्ये देखील मराठी उद्योजकांनाच प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी काँग्रेसने केली असुन ठाणे महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांच्या नावाचे फलक देखील मराठी भाषेत लावण्याची सक्ती करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top