ठाण्यात काँग्रेसची “याद करो कुर्बानी”, तिरंगा पदयात्रा संपन्न

ठाणे :- भारतीय सैन्यदलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमत्त ठाणे काँग्रेस च्या माध्यमातून “जरा याद करो कुर्बानी” तिरंगा पदयात्रा, ठाणे शहर (जि.)काँग्रेस अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण,प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस तसेच तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थितांनी अभिवादन करून पदयात्रेला सुरवात करण्यात आली.
सदर प्रसंगी भारतीय तिरंगा ध्वज हातात घेऊन जय जवान जय किसान,भारत माता की जय,वंदे मातरम् अशा घोषणा व देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले होते.सदर पदयात्रेचे ठाणे स्टेशन येथील थोर संविधानकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी उपस्थिताना विक्रांत चव्हाण यांनी संबोधीत केले.या वेळी त्यांनी बोलताना सांगितले की, भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, लालबहादुर शास्त्री,श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या काळात पाकिस्तान बरोबर झालेल्या विजयी युद्धाच्या घटनांचा परामर्श घेतला. व भारताने पाकिस्तानला कसे पराभूत केले याची माहिती दिली.पहेलगामच्या दुर्दैवी घटनेत नाहक बळी गेलेले पर्यटक, व ऑपरेशन सिन्दुर च्या माध्यमातून शहीद झालेले सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली.या वेळी स्व राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीवजी गांधी यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दलच्या स्मृती जागृत केल्या.भारत देशाप्रतीच्या घोषणा देऊन, तिरंगा पदयात्रेची समाप्ती करण्यात आली.
भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत ठाणे काँग्रेस चे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते राहुल पिंगळे,यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top