ठाण्यातील सहा माजी नगरसेवकांचा शिंदें च्या शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला

ठाण्यातील सहा माजी नगरसेवकांचा शिंदें च्या शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार

ठाणे :- कल्याण-डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारीगाव, विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदें च्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडले असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

आज ठाणे महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनिषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे,माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी व त्याचे पुत्र मंदार केणी यांनीही भगवा झेंडा हाती घेऊन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला.

ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेने सोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते याचा अनुभव जनतेने घेतलाय. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top