ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आयोजित ५९ वी सिनीयर मैदानी स्पर्धा दि.७ व ८ जून २०२५ रोजी मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम ,मुंब्राकौसा या ठिकाणी संपन्न झाली.या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सौ.संध्या मांड्रेकर यांच्या हस्ते झाला.
सदर स्पर्धेत ठा.म.पा.ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजनेचा मन्नू सिंग यांनी १५०० मी.धावण्याच्या स्पर्धेत ४ मिनीटे ०४.९ सेकंद वेळ देत नवा जिल्हास्तरीय विक्रम प्रस्थापित करत ५००० मी.धावण्याच्या स्पर्धेत उल्लेखनीय १५ मिनीटे ०९.८ सेकंद वेळ देत दुसरा विक्रम केला. तसेच महिला गटात ठा.म.पा.प्रशिक्षण योजनेची आदिती पाटिल हिने ८०० मी.धावण्याच्या स्पर्धेत २ मिनीटे २३.८ सेकंद वेळ देत नवीन विक्रम नोंदवला.सदर स्पर्धेत १८ संस्थांच्या जवळजवळ १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.सदर स्पर्धेचा बक्षीस समारंभ दि.८/०६/२०२५ रोजी संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,सचिव अशोक आहेर, सहसचिव राजेंद्र मयेकर,डॅा. एकनाथ सोपान पवळे,कृष्णा बनगर ,सचिन मराठे ,निलेश पाटकर, डॅा.यज्ञेश्वर बागराव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सदर स्पर्धेत ठाणे महानगरपालिका ॲथलेटिक्स प्रशिक्षण योजना संघ विजेता झाला. ह्या स्पर्घेकरिता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ठाणे महानगरपालिका क्रीडा विभागचे सहकार्य लाभले.
