ठाणे: आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज शहरात भाईंदर पाडा येथील पोष माता मंदिरा पासून भव्य अशी बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली ती रॅली शहरातील मुख्य भागातून निघाली या रॅलीत ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर, भिवंडी, शहापूर भागातून सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटार सायकल रॅली, शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला आहे. या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतिसूर्य विर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवाच्या जीवन पद्धती, चालीरीती, रुढी परंपरा, वादन, गीते, कला यांचे आयोजन करण्यात आले होते. या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे. आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले आहे.सदर कार्यक्रम प्रसंगी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले,
आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरठा,
आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव,
आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर संघटक निलेश महाले,
आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे,
मिरा भाईंदर संपर्क प्रमुख हरी पागेरा,
ठाणे शहर संघटक जितेंद्र भोये,
संपर्क प्रमुख भिवंडी हरेश गोवारी
संपर्क प्रमुख शहापूर सुनील भांगरे
समस्त महिला वर्ग, युवक, आदी समाज बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
