ठाणे :- एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघाने एफटीएल एकादश संघाचा तीन गडी राखून पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित उपमुख्यमंत्री चषक तेराव्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पुन्हा एकदा बाजी मारली. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माझा सेवा संस्था व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या पुढाकाराने आठ दिवस क्रिकेट स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे तेरावे वर्ष असून मोठ्या उत्साहात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या बक्षीस समारंभाला शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे, सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले- जाधव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. यामध्ये फलंदाज – चिन्मय सुतार, गोलंदाज – प्रशांत सोळंकी, मालिकावीर – साईराज पाटील, सर्वात जास्त षटकार – साईराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले. तर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब ब संघ विजयी ठरला असून सन्मानचिन्ह व १ लाख रुपयांच पारितोषिक देण्यात आले. तर सेकंड रनरअप एफटीएल एकादश संघाला सन्मानचिन्ह व ६१००० पारितोषिक देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राम रेपाळे, व संजय भोईर यांनी क्रिकेट स्पर्धेचे व माजी नगरसेवक विकास रेपाळे यांचे विशेष कौतुक केले. ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडू तयार झाले आहे. उच्चस्तरावर ते क्रिकेट खेळत असून ठाण्याचं नाव रोशन करताय. यामध्ये विकास रेपाळे यांचे मोठे श्रेय आहे. यंदा उपमुख्यमंत्री चषक हे नाव देण्यात आले आहे. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री चषक या नावाने ही स्पर्धा होईल. अशी इच्छा विकास रेपाळे यांनी व्यक्त केली.
