विधानभवनाच्या प्रांगणात रंगली ‘टेस्ला’ची चर्चा
टेस्ला या अमेरिकन कार कंपनीच्या देशातील पहिल्या दालनाचे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. आज ही गाडी विधानभवनात आणली असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची पाहणी करून ती चालवण्याचा आनंद घेतला.
तसेच या गाडीमध्ये असलेल्या वेगवेगळ्या फीचर्स आणि सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि टेस्ला कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.