आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली



ठाणे महापालिकेचा उपक्रम
वृक्षारोपण, पथनाट्य यांचेही आयोजन

ठाणे (२२) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (२२मे) निमित्ताने गुरूवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली.

गुरूवारी सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी समर्थ मठ या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेची सुरूवात जनजागृती करणाऱ्या रॅलीने झाली. या रॅलीत स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी, महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर, वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, ऑरनॅट या संस्थेच्या कलाकारांनी स्वच्छतेविषयी जागृती करणारे पथनाट्य सादर केले. या मोहिमेत, ठाणे पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक समूह, स्वराज महिला मंडळ, स्वराज सामाजिक संस्था, स्वामी समर्थ मठ सेवेकरी, योग ग्रुप, मीठबंदर रोड, चेंदणी कोळीवाडा कोळी समाज, आर्ट ऑफ लिव्हिंग- इको क्रांती, मनोहर चव्हाण, स्वप्नील कोळी, अरुण राजगुरू आदी सहभागी झाले.

त्याचबरोबर, याप्रसंगी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नागरिकांनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्यांच्यासह, मुख्य स्वच्छता निरीक्षक मयुरी वखारिया आणि शंभूराज कांबळे, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर आणि सुनील जगताप, अजय जगताप, संजू रणदिवे आदी सहभागी झाले होते.

तसेच, महापालिका मुख्यालय येथे दुपारी १२.३० वा. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी पथनाट्य सादर करण्यात आले. त्यावेळीही स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

या निमित्ताने, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्यांच्या मुलाखतीही घेण्यात येत आहेत. गुरूवारी त्या मालिकेचा आरंभ हिरवं स्वप्नं या संस्थेचे संस्थापक अनिल वाघ आणि प्रभा राव यांची पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या मुलाखतीने झाला. ही मुलाखत ठाणे रेडिओवर प्रसारित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top