उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सूचनेनंतर महापालिकेचा निर्णय
ठाणे/ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत प्रोबेशन कालावधीकरता (परिविक्षाधिन कालावधी) वारसा हक्काने अनेक सफाई कर्मचारी कार्यरत होते.हा केवळ तीन वर्षाचा कालावधी असतो.त्यानंतर हे कर्मचारी सेवेत कायम होतात.ठाणे महापालिकेतील सुमारे 155 सफाई कर्मचारी हे मागील आठ वर्षापासून सेवेत कायम झाले नव्हते.या कर्मचाऱ्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आपली समस्या माजी महापौर अशोक वैती यांच्याकडे मांडली.त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनानुसार 155 सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत वारसा हक्काने काही सफाई कर्मचारी समाविष्ट झाले होते. या कर्मचाऱ्यांना सुरवातीची दोन वर्षे प्रोबेशन (परिविक्षाधिन कालावधी ) काळ म्हणून कार्यरत राहावे लागते.नंतर हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी म्हणून रुजू होतात.मात्र ठाणे महापालिकेच्या सेवेत मागील आठ वर्षांपासून 155 सफाई कर्मचारी परिविक्षाधिन म्हणून रुजू झाले होते.मात्र परिविक्षाधिन कालावधी पूर्ण होऊन ही हे कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम झाले नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांची व्यथा शिवसेना शिंदे पक्षाचे माजी महापौर अशोक वैत्ती आणि मनोज शिंदे,अनिता बिर्जे,
यांच्या समोर जनता दरबाराच्या माध्यमातून मांडली.या समस्येची गंभीरतेने दाखल घेत अशोक वैती मनोज शिंदे आणि अनिता बिर्जे यांनी हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडला.त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शंभर सफाई कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत आयुक्त सौरव राव यांना सूचना केली.त्यानंतर आयुक्त राव यांच्या आदेशानुसार 155 सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने गुरुवारी घेतला आहे.दरम्यान नोकरीत कायम झालेल्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी माजी महापौर अशोक वैती यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.यावेळी माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते ॲड. प्रियंका सांगरे, इतर सहकारी उपस्थित होते.